लिंबाचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहे का?

आपल्या शरिराच्या स्वास्थ्यापासून ते सौॆदर्यापर्यंत लिंबूचे अनेक फायदे आहेत. रोजच्या स्वयंपाकामध्ये आणि वजन कमी करण्यासाठी लिंबूचा वापर आवर्जून केला जातो. लिंबूचे अनेक फायदे आहेत. चला तर मग जाणून घेऊयात लिंबूचे फायदे…

लिंबूचे फायदे खालीलप्रमाणे..

1. तुमचा चेहरा नेहमी ताजातवाना आणि फ्रेश ठेवण्यसाठी लिंबू अतिशय फायदेशीर आहे. चेहऱ्यावरील काळे डाग, ब्लॅकहेड्स दूर ठेवण्याासठी लिंबाचा वापर फायदेशीर ठरतो.

2, व्हिटॅमिन क चे प्रमाण लिंबामध्ये मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे तुमच्या आरोग्यासाठी रोज लिंबूपाणी पिणे हे लाभदायी आहे.

3. पोटाच्या समस्या असतील तर अशावेळी लिंबाचा रस, थोडस मीठ आणि त्यात थोडा खाण्याचा सोडा टाकून ते मिक्स करून पिल्याने तुमच्या पोटाला आराम मिळेल.

4. वजन कमी करण्यासाठी प्रामुख्याने लिंबाचा वापर केला जातो. लिंबामध्ये सायट्रिक अ्ॅसिड असल्यामुळे शरिरातील फॅट्स बर्न होतात. त्यामुळे रोज सकाळी उठल्यावर एक ग्लास कोमट पाण्यात लिंबू आणि मध घालून ते पाणी प्यावे.

5. ज्यांना मुतखड्याचा त्रास होतो अशांनी तर लिंबू पाणी जरूर प्यावे, त्यामुळे मुतखड्याच्या त्रासापासून आराम मिळतो.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here