ब्लॅकहेड्स, काळे डाग, घालवण्यासाठी बनवा ‘जिऱ्याचे फेसस्क्रब’

आपला चेहरा सुंदर दिसण्यासाठी आपण बरेच प्रयत्न करतो. हल्ली तरूणाईमध्ये ब्लॅकहेड्सच प्रमाण खूप वाढले आहे. यासाठी विविध क्रीम्स, स्क्रब्स वापरले जातात. मात्र, आपल्या स्वयंपाक घरात जेवणामध्ये वापरला जाणारा जिरा हा ब्लॅकहेड्स घालवण्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. जिऱ्याचा वापर चेहऱ्यावर स्क्रब म्हणून केल्यास आपला चेहरा उजळतो शिवया टॅनिंग, ब्लॅक-व्हाईट हेड्स देखील कमी होतात.

जिऱ्याचे फेस स्क्रब तयार करण्याची पद्धत खालीलप्रमाणे –
साहित्य – दोन चमचे जीरा, अर्धा कप साखर, एक चमचा मध, अर्धा कप बदामाचे तेल

प्रक्रिया – एका छोट्या बाऊलमध्ये बदामाचे तेल, मध एकत्र करा आणि त्याला चांगल्या प्रकारे मिक्स करा.आता त्यामध्ये जीरा आणि साखर टाका. नंतर या मिश्रणाला चांगल्या प्रकारे एकजीव करा. आता तुमचे स्क्रब तयार आहे. या मिश्रणाला तुम्ही एका बॉटलमध्ये भरूनही ठेवू शकता, आणि आठवड्यातून एक ते दोनवेळा हे स्क्रब तुम्ही चेहऱ्यावर लावा.

  • जिऱ्याचे स्क्रब लावल्याने होणारे फायदे –
  • जिऱ्यामध्ये भरपूर प्रमाणात मिनरल्स, आणि कॅल्शिअम असते त्यामुळे त्याने चेहरा उजळतो.
  • यासोबतच चेहऱ्यावरील काळे डाग, टॅनिंग, आणि काळी वर्तुळ घालवण्यास हे स्क्रब फायदेशीर आहे.

 

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.