ढोबळी मिरचीचे ‘हे’ फायदे तु्म्हाला माहित आहे का?

आहारामध्ये पालेभाज्यांचा समावेश आपण आवर्जून करतो. मात्र, फऴभाज्यांचाही समावेश असण तितकच गरजेच आहे. याच फळभाज्यांमधील काहींची आवडती तर काहींची नावडती भाजी म्हणजे शिमला मिरची. (ढोबळी मिरची) ढोबळी मिरचीमध्ये ‘व्हिटॅमिन क’ चे प्रमाण सर्वाधिक असते. ढोबळी मिरची ही अशा प्रकरची भाजी आहे, की जिचा वापर आपण अनेक प्रकारे करतो. चायनिज, फ्राईड राईस, इत्यादी अनेक रूपांमध्ये आपण तिचे सेवन करतो. चला तर मग या बहुगुणी ढोबळी मिरचीचे आज फायदे जाणून घेऊयात….

ढोबळी मिरचीचे फायदे खालीलप्रमाणे –

1. ढोबळी मिरचीमध्ये असलेल्या प्रोटीन्समुळे आपल्या हृदयाच्या समस्या दूर होण्यास मदत होते.

2. शरिराला ऑक्सिजनचा पुरवठा करण्यामध्ये ढोबळी मिरची फायदेशीर ठरते.

3. व्हिटॅमिन क चे प्रमाण सर्वाधिक असल्यामुळे शरिरातील लोहाची झीज भरून काढण्यासाठी ती लाभदायी ठरते.

4. ज्यांना वजन कमी करायचे आहे अशांसाठी तर ढोबळी अतिशय उपयुक्त आहे. कारण ढोबळीमध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असते. त्यामुळे ढोबळी मिरची खाल्ल्याने वजन वाढण्याची शक्यता अतिशय कमी असते.

5. मेंदूसाठी आणि ताण कमी करण्यासाठी ढोबळीचा आहारामध्ये जरूर समावेश करावा.

Leave A Reply

Your email address will not be published.