पुणे –शालेय स्तरावरील राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत पुण्याच्या अद्वैत पाटील याने दुसरा क्रमांक पटकावला आहे. या कामगिरीच्या जोरावर त्याची शालेय स्तरावरील आशियाई
स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
ही स्पर्धा फिलिपीन्स शालेय बुद्धिबळ संघटनेतर्फे तसेच आशियाई बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने येत्या 19 जुलैला आयोजित केली जाणार आहे.
अद्वैत हा सात वर्षांचा असून बिबवेवाडी येथील मुक्तांगण शाळेत दुसऱ्या इयत्तेत शिकत आहे. अद्वैतने राज्य स्तरावर दुसरा तर राष्ट्रीय स्तरावर सातवा क्रमांक पटकावला आहे.