नारायणगाव -सामाजिक उपक्रमांत नेहमीच अग्रभागी असणारे ऍड. तुषार पाचपुते युवा मंचच्या वतीने करोना या संसर्गजन्य रोगाच्या जुन्नर तालुक्यात वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आदर्शगाव वडगाव (कांदळी) ग्रामपंचायतीस सॅनिटायझर सेन्सर मशिन, तसेच हॅण्डवॉश आणि सॅनिटायझरचे मोफत वाटप करण्यात आले आहे.
युवा मंचच्या माध्यमातून सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करत हे साहित्य ग्रामपंचायत कार्यालयात देण्यात आले. याबरोबरच पुढेही प्रशासनातील आरोग्य सेवक आणि पोलीस कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर सेन्सर मशिन, तसेच हॅण्डवॉश, आणि सॅनिटायझर वाटप केले जाणार आहे, असे ऍड. पाचपुते युवा मंचच्या वतीने सांगण्यात आले आहे.