आता 10 वी नंतरही घेता येणार सीए फौंडेशनला प्रवेश

नवी दिल्ली – आता इयत्ता 10 वीच्या परीक्षेनंतरही सीए फौंडेशनच्या अभ्यासक्रमासाठी तात्पुरता प्रवेश घेता येऊ शकणार आहे. मात्र इयत्ता 12 वीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावरच या विद्यार्थ्याचा हा तात्पुरता प्रवेश निश्‍चित समजला जाऊ शकणार आहे. मात्र या हंगामी प्रवेशामुळे विद्यार्थ्यांना सीए चा अभ्यासक्रम सध्याच्या कालमर्यादेपेक्षाही सहा महिने आगोदरच पूर्ण करता येऊ शकणार आहे.

“इन्स्टिट्युट ऑफ चार्टर्ड अकौंटंटस ऑफ इंडिया’ने केलेल्या या हंगामी प्रवेशाच्या तरतूदीला सरकारने अलिकडेच मान्यता दिली आहे, असे “आयसीएआय’चे अध्यक्ष अतुल कुमार गुप्ता यांनी सांगितले.

इयत्ता 10 वी नंतर लगेचच सीए फौंडेशन अभ्यासक्रमासाठी तात्पुरता प्रवेश निश्‍चित झाल्यावर विद्यार्थ्यांना आपले ज्ञान अद्ययावत करण्यासाठी आणि सीए फौंडेशन उत्तीर्ण होण्यासाठीच्या पूर्वतयारीसाठी पुरेसा अवधी मिळू शकणार आहे. सीए फौंडेशनसाठी “आयसीएआय’कडून मोफत ऑनलाईन क्‍लासेसही उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली आहे, असेही गुप्ता यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.