पुणे :’पॉलिटेक्‍निक’ची प्रवेश प्रक्रिया येत्या सोमवारपासून

पुणे : तंत्रशिक्षण संचालनालयच्या अखत्यारित प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रम अर्थात पॉलिटेक्‍निकची प्रवेशप्रक्रिया दि. 10 ते 25 ऑगस्ट या कालावधीत राबविण्यात येणार आहे, अशी माहिती उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी ट्विटद्वारे दिली.

दहावी निकालानंतर पॉलिटेक्‍निक अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचे लक्ष असते. यंदा मात्र दहावी निकाल जाहीर होऊन आठवडा उलटले. तरीही पॉलिटेक्‍निकचे प्रवेश अजूनही सुरू झालेले नाहीत. या प्रवेशाच्या प्रतिक्षेत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणमंत्र्यांनी ट्‌विट करत प्रवेशप्रक्रिया येत्या दि.10 ऑगस्टपासून ऑनलाइनद्वारे सुरू होणार असल्याचे स्पष्ट केले.

यंदाच्या वर्षातील प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी राज्यामध्ये अभियांत्रिकी पदविका प्रवेशासाठी 336 सुविधा केंद्रांची व बारावीनंतरच्या पदविका अभ्यासक्रमांसाठी 242 सुविधा केंद्रांची निवड केलेली आहे. करोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर सुरक्षिततेसाठी, गर्दी टाळण्याचे दृष्टीने कागदपत्रांच्या प्रत्यक्ष तपासणी ऑनलाइनद्वारे होणार आहे.

याद्वारे अर्जदारास प्रत्यक्ष सुविधा केंद्रास भेट देण्याची आवश्‍यकता नाही. अर्ज भरण्यापासून संस्थेत प्रवेश निश्‍चिती करण्यापार्यतची सर्व प्रक्रिया ते स्वतः ऑनलाइन पद्धतीने करू शकतील, असे उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.