पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदव्युत्तर, पदवी, इंटिग्रेटेड, आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रम या विद्यापीठातील अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्यास 1 ते 30 जूनपर्यंत मुदत दिली आहे, अशी माहिती विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागाकडून देण्यात आली.
विद्यापीठात 50 हून अधिक पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे शैक्षणिक विभाग आहेत. या अभ्यासक्रमांसाठी दरवर्षी प्रवेश परीक्षा घेतली जाते. या प्रवेश परीक्षा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात येणार आहे. त्याचा निकाल विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जाणार आहे.
प्रवेश परीक्षेसाठी लिंक : https://campus.unipune.ac.in/ccep/login.aspx