“बी.व्होक’च्या रिक्‍त जागांसाठी प्रवेश प्रक्रिया

इच्छुक विद्यार्थ्यांना 25 सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत

 

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कौशल्य विकास केंद्रामार्फत चालविण्यात येणाऱ्या विविध बी.व्होक अभ्यासक्रमांच्या रिक्‍त जागांसाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. रिक्‍त जागांवर प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना 25 सप्टेंपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे.

पुणे विद्यापीठाच्या कौशल्य विकास केंद्राकडून बी.व्होक अभ्यासक्रम सुरू आहेत. या अभ्यासक्रमांसाठी विद्यापीठाकडून ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र, अभ्यासक्रमांसाठी जागा रिक्‍त राहिल्या. त्यामुळे विद्यापीठाने या अभ्यासक्रमांसाठी पुन्हा नव्याने प्रवेश प्रक्रिया सुरू केली.

त्यानुसार विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने येत्या 25 सप्टेंबरपर्यंत अर्ज करायचे आहेत, अशी माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली. प्रवेश प्रक्रिया आणि शुल्क भरण्याबाबत अधिक माहिती विद्यापीठाच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे, अशी माहिती विद्यापीठाचे उपकुलसचिव उत्तम चव्हाण यांनी सांगितले.

दरम्यान, “बी.व्होक’मध्ये ऑटोमोटिव्ह ऑटोमेशन, आयटी अँड आयटीइज, ज्वेलरी डिझाइन अँड जेमोलॉजी, रिन्यूएबल एनर्जी, रिटेल मॅनेजमेंट, ऑटोमोटिव्ह मॅन्युफॅक्‍चरिंग या अभ्यासक्रमांचा समावेश आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.