वाघोली (प्रतिनिधी) – वढू खुर्द येथील शेकडो कार्यकर्त्यांनी मनसे विधी विभागाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष ॲड. गणेश म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुण्यातील फेऱ्या वाढल्याने शहरासह ग्रामीण भागतील तरुण मनसेकडे आकर्षिला जात असल्यामुळे तालुक्यासह जिल्ह्यात मनसेची ताकद वाढत असल्याचे मनसे विधी विभागाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष गणेश म्हस्के यांनी सांगितले.
पूर्व हवेलीतील वढू खुर्द येथील शेकडो कार्यकर्त्यांनी मनसेचे ॲड. गणेश म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली रविवार (दि. ५ सप्टेंबर) रोजी शेकडो कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केला. राज ठाकरे यांच्या पुण्यातील फेऱ्या वाढल्याने पुणे शहरासह ग्रामीण भागात देखील मनसेने कात टाकली असल्याचे पहावयास मिळत आहे.
प्रवेश कार्यक्रमप्रसंगी जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी अग्रेसर व्हा, मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे विचार घरा-घरात पोहचवण्याचे काम करा असे आवाहन मनसे सैनिकांना केले. येत्या काळात वाड्या वस्त्यावर मनसेच्या शाखा दिसतील असे प्रतिपादन ॲड. गणेश म्हस्के यांनी केले.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष किरण गव्हाणे, सहकार सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता व्यवहारे, तालुका संघटक सुनील राऊत, तालुका उपाध्यक्ष संतोष कंचे, शिरूर तालुका उपाध्यक्ष तेजश यादव, जनहित तालुका अध्यक्ष हितेश बोऱ्हाडे, विभाग प्रमुख आबा वाळके, सुहास गायकवाड, गणेश तापकिर, विशाल पानसरे, रोशन नवले, प्रणव भिलारे आदी मान्यवर उपस्थित होते.