नवे नौदलप्रमुख म्हणून ऍडमिरल करमबीर सिंह यांनी कार्यभार स्वीकारला

नवी दिल्ली- भारतीय नौदलाचे 24 वे नवे प्रमुख म्हणून ऍडमिरल करमबीर सिंह यांनी आज पदाची सूत्रे हाती घेतली. ऍडमिरल करमबीर सिंह पुण्याजवळच्या खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे माजी विद्यार्थी आहेत. 1980 साली त्यांनी नौदलात प्रवेश केला आणि 1981 साली हेलिकॉप्टर पायलट म्हणून त्यांनी चेतक आणि कमाऊ हेलिकॉप्टर्स हाताळली. मुंबईतील वेलिंग्टन नौदल महाविद्यालयातून त्यांनी संरक्षण सेवेची पदवी घेतली आहे.

आपल्या 39 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी तटरक्षक दल, आय एन एस विजयदुर्ग तसेच क्षेपपणास्त्र विनाशिका युद्धनौका आय एन एस राणा आणि आय एन एस दिल्ली यावर काम केले आहे. त्याशिवाय, मुंबईच्या नौदल कार्यालयासह आणखी काही कार्यालयांचे प्रमुख म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे.

पूर्व नौदल कमांडचे प्रमुख, तसेच अंदमान-निकोबार येथे तिन्ही दलांच्या कमांडचे प्रमुख अशा महत्वाच्या पदांवर फ्लॅग ऑफिसर म्हणून ऍडमिरल करमबीर सिंह यांनी जबाबदारी सांभाळली आहे. नौदलप्रमुख म्हणून जबाबदारी संभाळण्यापूर्वी ते विशाखापट्टणम येथे पूर्व विभागाचे नौदल प्रमुख म्हणून कार्यरत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)