कौतुकास्पद! ‘या’ बॉलिवूड सेलेब्सने डोनेट केले स्वत:चे ४२ लीटर ब्रेस्ट मिल्क

जगभरात करोना व्हायरसने हाहाकार माजवल्याने मागील ८ महिने देशभरात लॉकडाऊन करण्यात आले होते. यादरम्यान नागरिकांना पैसे, रेशन, फूड पॅकेट्स, मास्क आणि पीपीई किट सारख्या वस्तू बॉलिवूडकरांनी दान केल्या होत्या. परंतु, एका बॉलिवूड सेलेब्सने जवळपास ४२ लिटर ब्रेस्ट मिल्क दान केले आहे. त्यांच्या या निर्णयाचे नेटकऱ्यांनीही कौतुक केले आहे.

‘सांड कि आंख’च्या चित्रपट निर्मात्या निधी परमार हिरानंदानी यांनी लॉकडाऊन काळात स्वत:चे ४२ लीटर दूध दान केले आहे. ४१ वर्षीय निधी परमार हिरानंदानी यांनी फेब्रुवारीमध्ये बाळाला जन्म दिला होता. यानंतर खूप सारं ब्रेस्ट मिल्क वाया जात आहे. कारण मुलगा पूर्ण दूध पित नव्हता, असं जाणवले. यानंतर त्यांनी ब्रेस्ट मिल्क दान करण्याचा निर्णय घेतला. मी इंटरनेटवर वाचलं होतं की, ब्रेस्ट मिल्क ३ ते ४ महिने फ्रीजरमध्ये ठेवलं जाऊ शकते, असे निधी यांनी एका मुलाखतीत सांगितले.

निधी यांनी सांगितले कि, मुंबईच्या एका स्त्रीरोगतज्ज्ञांनीशी संपर्क साधल्यावर त्यांनी सूर्या  हॉस्पिटलमध्ये मिल्क डोनेट बँक असल्याचे सांगितले. लॉकडाऊन असल्याने मी घराबाहेर पडू शकत नव्हते. मात्र, हॉस्पिटल प्रशासनाने तत्परता दाखवत झिरो कॉन्टॅक्ट पिकअप सुविधा उपलब्ध करून दिली. 

निधी पुढे म्हणाल्या की, काही दिवसांपूर्वीच मी रुग्णालयात गेले होते. मी दान केलेल्या दूधाचा कसा वापर केला जात आहे, याबाबत मला माहिती पाहिजे होती. या हॉस्पिटलमध्ये ६० अशी मुले होती ज्यांना दूधाची गरज होती, असेही त्यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.