पुणे : पूना नाइट हायस्कूल व श्रीमंत दगडूशेड हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट ज्युनिअर कॉलेजचा बारावीचा निकाल 100 टक्के लागला आहे. परीक्षेसाठी 79 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. हे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
परशुराम पवार याने नोकरी करत 79 टक्के गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम क्रमांक मिळविला आहे.आर्यन उत्तेकर याने 76.67 टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक प्राप्त केला. अक्षदा चारगे हिने 75.50 टक्के गुण मिळवून महाविद्यालयात तृतीय क्रमांक व मुलींमध्ये पहिला क्रमांक मिळविला आहे.
मुलींमध्ये प्रगती बेंडल हिने 71.83 टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक प्राप्त केला. दीप्ती उपाध्ये हिने 69 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला आहे. सर्व विद्यार्थ्यांना सरस्वती मंदिर संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा.वि.वि.आंबेकर यांचे मार्गदर्शन लाभले. प्राचार्य सतीश वाघमारे व सर्व शिक्षक, कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
परशुराम हा वाणिज्य शाखेतील विद्यार्थी दिवसभर सदाशिव पेठेतील एका खासगी ऑफिसमध्ये काम करतो. त्याने काम करता करता दिवसा व रात्री वेळ काढून अभ्यास केला अन् महाविद्यालयात प्रथम क्रमांक मिळविला. याच्या वडिलांचे निधन झाले. आई, दोन बहिणी अशा परिवारासह तो धनकवडी येत राहत आहे.