कौतुकास्पद ! देशात तब्बल ‘एवढ्या’ नागरिकांना दिली कोरोनाची लस ; जगातही लसीकरणाला वेग

नवी दिल्ली : कोरोनाची रुग्ण संख्या ही मागील काही दिवसांपासून कमी होताना दिसत आहे. मात्र कोरोना पूणर्पणे घालावण्यासाठी कोरोना लसीकरणाची प्रक्रिया देशात सुरु करण्यात आली आहे. देशात लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात हेल्थवर्कर्सना कोरोना वॅक्सिन देण्यात येत आहे. तसेच प्रत्येक दिवशी कोरोना लस घेणाऱ्या लोकांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत देशात 16 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लस देण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.

देशात कोरोना लसीकरणाची सुरुवात 16 जानेवारीपासून झाली होती. तसेच 24 जानेवारीपर्यंत देशात 16,13,667 लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. देशात कोरोना वॅक्सिनेशनमध्ये सर्वात पुढे कर्नाटक आहे. कर्नाटकात 1.91 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त उडीसामध्ये 1.52 लाखांहून अधिक, आंध्रप्रदेशात 1.47 लाखांहून अधिक, उत्तर प्रदेशात 1.23 लाखांहून अधिक आणि तेलंगाणामध्ये 1.10 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे.

तर दुसरीकडे जगातील कोरोनाच्या लसीकरणाने देखील वेग धरला आहे. आतापर्यंत जगभरात 6 कोटींहून अधिक लोकांना कोरोना वॅक्सिन देण्यात आले आहे. या प्रकरणात अमेरिका सर्वात पुढे राहिली आहे. अमेरिकेत आतापर्यंत 2 कोटींहून अधिक लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त चीनमध्ये 1.5 कोटी लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. अशातच जगभरात सर्वात आधी कोरोना लसीकरणाची सुरुवात झालेल्या ब्रिटनमध्ये आतापर्यंत 63 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे.

त्यानंतर इज्राइलचा क्रमांक येतो. इज्राइलमध्ये आतापर्यंत 24 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. जर्मनीमध्ये 16.3 लाखांहून अधिक लोकांना कोरोना वॅक्सिन देण्यात आलं आहे. त्यानंतर भारताचा क्रमांक येतो. भारतात आतापर्यंत 16.1 लाखांहून अधिक लोकांना कोरोना वॅक्सिन दिले गेले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.