पुणे, – कोरोना संकटकाळात समाजिक बांधिलकीच्या नात्यातून फेसबूकवरील कुबेर फाऊंडेशन समूहाकडून ‘मुख्यमंत्री सहायता निधीला’ दोन लाख रुपयांची अर्थिक मदत देण्यात आली. गुरुवारी (दि.७) राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे हा धनादेश सुपुर्द करण्यात आला.
सामाजिक जाणीवेतून आठ वर्षांपूर्वी फेसबुकवर कुबेर नावाच्या समुहाची स्थापना करण्यात आली. शिक्षण, कला , क्रिडा , राजकारण , समाजकारण इत्यादी क्षेत्रातील सुमारे अडीच हजार समविचारी लोकांचा हा समूह आहे. समाजभावनेतून यापूर्वी समुहाने पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदत, रक्तदान शिबिरं, शहादा तालुक्यातील आदिवासी लोकांचे सर्वरोग निदान शिबीर,महाराष्ट्रातील विविध ठिकाणचे वृद्धाश्रम असो वा अनाथ आश्रमात सामाजिक उपक्रम राबविले आहेत.
मुलांना शालोपयोगी वस्तूंचे वाटप, व्यसनमुक्ती केंद्रातील लोकांसाठी प्रबोधनात्मक कार्यक्रम, वृद्धाश्रमातील लोकांसाठी वैयक्तिक आरोग्यदायी वस्तूंचे वाटप प्रबोधनात्मक उपक्रम राबविले आहेत.
कोरोनाचा वाढता कहर पाहता समुहाने महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त जनतेसाठी आर्थिक मदत म्हणून मुख्यमंत्री सहाय्यतानिधीत दोन लाख रुपयांचा निधी देण्याचा ठराव फाऊंडेशनचे अध्यक्ष संतोष लहामगे, उपाध्यक्ष प्रशांत जोशी ,कार्याध्यक्ष चंद्रकांत माने, मिनल गिरडकर नंदू सावंत, डॉ. प्रशांत दौंडकर यांच्यासह कुबेर फाऊंडेशनचे डॉ.अभिजित कदम , अॅड.लीना प्रधान गुरव ,जतीन तिवारी, शैलेश कलंत्री, अमेय सोनावण, नितीन नरखडे , प्रशांत दाते, विजया शिंदे, राहुल बेलदरे सर्व संचालक मंडळाच्या संमतीने प्रारीत करण्यात आला.
यानूसार गुरुवारी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्याकडे धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी कुबेर फाऊंडेशनचे अॅड. प्रशांत गुंजाळ, सचिन गणोर, शोहरब पठाण, अमोल बस्ते, प्रथमेश बेल्हेकर, गौरव डोंगरे, कृष्णा कापकर आदी उपस्थित होते.