कर्तव्यकठोर प्रशासकीय अधिकारी ‘तुकाराम मुंढे’ यांना अखेर नियुक्ती

मुंबई : राजकारण्यांच्या दबावापुढे न झुकता नियमानुसार काम करणे ही तुकाराम मुंढे यांची ओळख आहे. तुकाराम मुंढे आणि बदली हे समीकरण सर्वश्रुत झाले आहे. तुकाराम मुंढे हे शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखले जातात.  तुकाराम मुंढे यांची नागपूरच्या आयुक्तपदावरून काही महिन्यांपूर्वी बदली झाली होती. त्यानंतर तुकाराम मुंडे यांच्याकडे कुठल्याही विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली नव्हती. त्यामुळे ते पदभाराविना होते. दरम्यान, आज अवघ्या पाच महिन्यांपूर्वीच बदली करण्यात आलेले मुंबईत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव तुकाराम मुंढे यांची राज्य मानवाधिकार आयोगाच्या सचिवपदी सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

धडाकेबाज कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणून तुकाराम मुंढे सर्वपरिचित आहेत. त्यांचे धाडसी निर्णय आणि कार्यशैलीमुळे ते नेहमीच वादग्रस्त ठरलेले आहेत.  याचमुळे पाच महिन्यांपूर्वीच त्यांची नागपूरच्या पालिका आयुक्तपदावरून थेट महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती. पण पाच महिनेही पूर्ण होत नाहीत तोच पुन्हा एकदा त्यांची बदली करण्यात आली आहे. आता त्यांची राज्य मानवाधिकार आयोगाचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

दरम्यान, तुकाराम मुंढे यांच्यासह आज चार अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. उदय जाधव यांची राज्य बाल हक्क आयोगाचे सचिव म्हणून तर एमपीसीएलचे अतिरिक्त मुख्यसचिव अरविंद कुमार यांची मंत्रालयात मार्केटिंग आणि टेक्स्टाईल विभागात बदली करण्यात आली आहे. डी. बी. गायकवाड यांची सार्वजनिक आरोग्य विभागाचे ज्वॉईंट सेक्रेटरी म्हणून नियुक्ती केली गेली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.