बारामती : करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने बारामती सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. करोनाचा दर दहा टक्क्यांच्या आत आला असल्याने मंगळवारपासून सकाळी 9 ते दुपारी 1 पर्यंत सर्व दुकाने सुरू ठेवण्यासाठी प्रशासनाने परवानगी दिली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या देशांमध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. तब्बल दोन महिन्यानंतर दुकाने सुरू होत असल्याने व्यापार्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
अत्यावश्यक बाबींमध्ये
रुग्णालय, रोगनिदान केंद्र, क्लिनिक्स, लसीकरण केंद्र, वैद्यकीय विमा कार्यालय, औषध दुकान, औषध वितरण व वितरक, वाहतूक व पुरवठा साखळी, लस, निर्जुंतके, मास्क, वैद्यकीय उपकरणे, त्यांना सहाय्यभूत कच्चा माल उद्योग व अनुषंगिक सेवा यांचे उत्पादन व वितरण.
शासकीय व खाजगी पशुवैद्यकीय सेवा दवाखाने, अँनिमल केअर सेंटर व पेट फूड शॉप
वन विभागाने घोषित केल्यानुसार वनीकरण संदर्भातील कामकाज
किराणा सामान दुकाने, भाजीपाला दुकाने, फळविक्रेते, दुध डेअरी विक्रेते, बेकरी, मिठाई, सर्व प्रकारची खाद्य दुकाने (चिकन, मटण, मासे, अंडी व पोल्ट्री दुकाने), शासकीय विभाग, वैयक्तिक करायच्या सर्व मान्सूनपूर्व कामकाजासाठीची आवश्यक साहित्याची दुकाने, छत्री दुरुस्तीची दुकाने, प्लॅस्टिक शिट, ताडपत्री, रेनकोट, वस्तू विक्री व दुरुस्ती दुकाने, शीतगृहे व साठवणूकीची गोदामे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, पेट्रोल पंप, पाणीपुरवठा विषयक सेवा, शेती संबंधित सर्व कामकाज तसेच शेतीपूरक बी, बियाणे, खते, औषधे पूरक वस्तू विक्री दुकाने तसेच दुरुस्तीची दुकाने, शासकीय व खाजगी सुरक्षा विषयक सेवा, सर्व एटीएम, पावसाळी हंगामासाठी आवश्यक वैयक्तिक व संस्थांसाठीचे वस्तुंचे उत्पादन करणारे घटक.