शिरूरमध्ये प्रशासन सज्ज – पाटोळे

शिरूर-शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. 21) होत असलेल्या मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज झाले असून 389 मतदान केंद्रावर रविवारी (दि. 19) साहित्यासह कर्मचारी रवाना होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमंत पाटोळे यांनी दिली.

शिरूर हवेली मतदारसंघात एकूण सात मंडलभागातंर्गत मूळ 376, सहाय्यकारी तेरा अशी 389 मतदान केंद्र आहेत. एकूण 30 झोन आहेत. या केंद्रावर एकूण 2547 कर्मचारी तैनात केले जाणार आहेत. यात मतदान अधिकारी, कर्मचारी तसेच पोलिसांचा समावेश आहे. मतदान पथकांसाठी एकूण 87 वाहनांची सोय करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.