गणेशोत्सव, मोहरमसाठी प्रशासन सज्ज : श्‍वेता सिंघल 

कराड – गणेशोत्सव व मोहरम सणानिमित्त सर्व अधिकाऱ्यांना उत्सवा संदर्भात सूचना केल्या आहेत. येणाऱ्या उत्सवासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. गणेश भक्तांनी पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर भर द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी केले.
कराड येथे मंगळवारी सार्वजनिक गणेशोत्सव व मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत त्या बोलत होत्या.

यावेळी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस निरीक्षक धीरज पाटील, पोलीस उपअधीक्षक नवनाथ ढवळे, तहसीलदार अमरजित वाकडे, कराड शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड, तालुक्‍याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, मलकापूरच्या नगराध्यक्षा निलीमा येडगे, कराडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, मलकापूरच्या मुख्याधिकारी संजिवनी दळवी, मुख्याधिकारी यशवंत डांगे व गणेश मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्वेता सिंघल म्हणाल्या, मिरवणूक मार्गावरील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. याची दुरुस्ती करण्याचे आदेश दिले आहेत. विसर्जन मार्गावर घाटावर पुरामुळे पाण्यामुळे पडलेले खड्डे भरून घ्यावेत. उत्सव काळात गैरवर्तन करणाऱ्यांची माहिती प्रशासनाला द्या. त्यावर योग्य ती कारवाई करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते म्हणाल्या, गणेशोत्सव व मोहरम या उत्सव काळात 100 टक्के दारूबंदी करणार आहे. गणेश मंडळांना परवाने आवश्‍यक असून, सिटीझन पोर्टलद्वारे मंडळाने परवानगी घ्यावी. उत्सव काळात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक पोलिसांची व्यवस्था करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)