नगर, (प्रतिनिधी) – अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या विरोधात महसूल प्रशासनाने कंबर कसली आहे प्रशासन राबवत असलेल्या धोरणात काही लोक अडथळे निर्माण करत आहेत.
अडथळ्यांची ही अडचण मोडून काढत नागरिकांसाठी पारदर्शी सुलभ व्यवस्था उभी करण्याचा मानस आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करत वाळू तस्कर अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या विरोधात धडक कारवाई सुरू आहे तसेच पुरावा न देणाऱ्या वाळूसाठ्यावरून दंड करण्यास प्रशासन कोणतीही कुत्राही करणार नाही अशी माहिती अप्पर जिल्हाधिकारी सुहास मापारी यांनी दिली आहे
जिल्ह्यात महसूल विभागाकडून स्वस्त वाळूचे बारा डेपो तयार करण्यात आले आहेत या ठिकाणी 600 रुपये ब्रास वाळूची किंमत असली तरी वाहतूक खर्चासह त्याची किंमत 1000 रुपये ब्रास पर्यंत जात आहे.
नागरिकांना सहजासहजी वाळू उपलब्ध व्हावी यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे दुसरीकडे प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करत वाळू आणि गौण खनिजाच्या तस्करीवर नियंत्रण आणले जात आहे गेल्या आठ महिन्यापासून नगर पुणे महामार्गावर सुपा टोल नाका येथे आहे
आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रणालीचा वापर करत वाहन स्कॅन करून गौण खनिज वाहतूक शोधली जात आहे संबंधित वाहनांच्या डेटाबेसच्या माध्यमातून वाहन चालकापर्यंत पोहोचून अवैध गहू खनिज वाहतूक करणाऱ्यांना दंड करण्यात येत आहे यापूर्वी अवैध गौण खनिज वाहतुकीमध्ये खोटे नाव सांगून सुटका करण्याचा प्रयत्न होत होता.
मात्र आता ते शक्य नाही आठ महिन्यापासून सुपा टोल नाक्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक वाहनांचा गौण खनिज वाहतूक डिटेक्ट करण्यासाठी स्कॅनिंग केले जात आहे यासाठी विशेष कक्ष कार्यान्वित आहे 15 जानेवारीपासून आतापर्यंत या मार्गावर 40 हजार वाहन यांचे स्कॅनिंग करण्यात आले आहे
नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात यासाठी वार रूम कार्यरत असून तेथून नियंत्रण करण्यात येत आहे असा प्रयोग राज्यात बहुदा नगर जिल्ह्यातच होत असून लवकर तो नाशिक पुणे रोड औरंगाबाद रोड वर असणाऱ्या टोल नाक्यावर राबवण्यात येणार आहे.
यासाठी महा खनिज मधून निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत खान पट्ट्यातून काढण्यात येणारी खडी नदी पात्रातील वाळू कुठून निघाली कोठे चालली सध्या स्थिती ती कोठे आहे
यावर जीपीएस प्रणाली द्वारे नजर ठेवता येत आहे यामुळे आता अवैध वाळू गौण खनिजाच्या विरोधात रात्रीच्या वेळी संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन कारवाईची गरज नाही त्यासाठी ड्रोन च्या माध्यमातून अवघड ठिकाणी लपवलेली गौण खनिज साठे शोधले जात आहे आता आपल्या घरासमोर पडलेल्या वाळूचा हिशोबही द्यावा लागणार आहे
अवैध वाळू तस्करावर ड्रोन ची नजर
नदीपात्रात अथवा नदी काठावर असलेल्या वेड्या बाभळींच्या जंगलात वाळूसाठी लपवल्याचे प्रकारे प्रशासनाने शोधून काढले आहेत काही ठिकाणी तर माणसांना पायी जाणे अवघड आहे अशा ठिकाणी रोखण्यासाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे.
गौण खनिज वाळू तस्करी विरोधात ड्रोन तंत्रज्ञान अत्यंत प्रभावी ठरल्याचे महसूल प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे त्यामुळे आता वाळू तस्करांची अवैध वाळू वाहतुकांची गाई केली जाणार नाही असा सज्जड इशाराही महसूल प्रशासनाने दिला आहे