फतेहपूर – ज्या वयात लहान मुलांवर चांगले संस्कार होणे आवश्यक आहे, त्या वयात कॉंग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी त्यांना शिव्या द्यायला शिकवत आहेत. हेच कॉंग्रेसचे खरे चरित्र आहे असा घणाघाती आरोप उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी केला आहे.
फतेहपूरमधील एका सभेत आदित्यनाथ बोलत होते. ते म्हणाले, काही दिवसांपूर्वी कॉंग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांच्यासमोर अमेठीत काही लहानग्यांनी चौकीदार चोर है ची घोषणा दिली. लहान मुले चौकीदार चोर है च्या घोषणा देत असल्याचा व्हिडीओही व्हायरल झाला होता. निवडणुकीच्या प्रचारावेळी मुलांचा वापर करणे बरोबर नसल्याचे त्यानी सांगतिले.
प्रियांका गांधी यांच्या विरोधात राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने निवडणूक आयोगाला पत्र लिहून प्रियांका गांधींची तक्रार केली होती. व्हायरल झालेला व्हिडीओ हा 1 मे रोजीचा आहे. व्हिडीओमध्ये लहान मुले पंतप्रधान नरेंद्र मोदींना शिवीगाळ करत आहेत. राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने यासंदर्भात ती बाब मुलांच्या विकासासाठी चांगली नाही. असे निवडणूक आयोगाला पत्र लिहून सांगितले होते. लहान मुलांना निवडणूक प्रचार आणि निवडणुकीसंदर्भातील गोष्टींमध्ये सामील करू घेऊ नये, असेही राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने म्हटले आहे. त्यावर योगी आदित्यनाथ यांनी प्रियांका गांधींवर निशाणा साधला.