निवडणूक लढवण्याचा निर्णय आदित्य ठाकरे स्वतः घेतील- मिलिंद नार्वेकर

मुंबई – युवासेना अध्यक्ष ‘आदित्य ठाकरे’ यांनी विधानसभा निवडणूक लढवावी अशी मागणी त्यांच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आली होती. युवासेनेचे पदाधिकारी वरून सरदेसाई यांनी सोशल मीडियावर यासंदर्भात एक पोस्ट टाकून आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवावी अशी इच्छा व्यक्त केली होती. “हीच वेळ आहे..हीच संधी आहे..लक्ष्य – विधानसभा २०१९ !! महाराष्ट्र वाट पाहतोय” अशी पोस्ट वरून देसाई यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर केली असून, आदित्य ठाकरे यांना देखील टॅग केली आहे.

दरम्यान, याविषयी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांना देखील आपले मत व्यक्त केले आहे. “निवडणूक लढवण्याबाबतचा निर्णय आदित्य ठाकरे स्वत: किंवा उद्धव ठाकरे घेतील. निवडणूक लढवण्याचा त्यांचा निर्णय स्वागतार्ह आहे.आदित्य ठाकरे जो निर्णय घेतील त्यांचं शिवसैनिक आनंदाने स्वागत करतील”.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here