निलेश राणे यांचे नाव ऐकताच आदित्य ठाकरेंची ‘ही’ प्रतिक्रिया

नाशिक – शिवसेनेच्या युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे हे सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशिक मधील आदित्य संवाद या कार्यक्रमात आज एक मजेशीर किस्सा घडला. या कार्यक्रमात ज्यांना प्रश्न विचारायचे आहेत त्यांनी आपली नावे कागदावर लिहून एका काचेच्या भांड्यात ठेवली होती. यावेळी सुरवातीलाच आदित्य ठाकरे यांनी एक चिठ्ठी त्यातून निवडली. आणि त्यांना ती चिट्ठी वाचून हसू आवरले नाही, तर त्याच वेळी त्याच्या तोंडून पहिली प्रतिक्रिया ‘अरे बापरे’ अशीही आली.

झाले असे की, कार्यक्रमाच्या सुरवातीलाच आदित्य ठाकरे यांनी जी चिट्ठी निवडली त्यावर ज्या व्यक्तीने प्रश्न विचारला होता, त्याचे नाव निलेश राणे असे होते. यामुळेच आदित्य ठाकरेंच्या तोंडातून आपोआपच ‘अरे बापरे’ असे उच्चार आले. यामुळे त्यांना हसू ही आले. यामुळे उपस्थितांमध्ये देखील एकच हशा पिकला. पुढे या व्यक्तीला प्रश्न विचारताना आदित्य ठाकरे यांनी मजेत ओळखपत्र आहे का? अशी देखील विचारणा केली.

 

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×