मुंबई – पक्षबांधणीसाठी राज्यभर दौऱ्यावर असलेल्या माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राजीनामा देऊन त्यांच्याविरोधात वरळीमधून निवडणूक लढण्याचे चॅलेंज दिले होते. मुख्यमंत्री शिंदेंनी आता ठाकरेंच्या या आव्हानाला प्रत्युत्तर दिले आहे. ‘मी अशी छोटी नाही तर फक्त मोठी आव्हान स्वीकारतो असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठणकावून सांगितले आहे. आता या मुद्यावर रामदास कदम यांनी माध्यमांशी बोलतांना आदित्य ठाकरेवर टीका केली आहे.
रामदास कदम म्हणाले,’आदित्य ठाकरे सध्या मुख्यमंत्र्यांना चॅलेंज देतोय. पण अरे.. तुझ्यासाठी तुझ्या बापाने उद्धधव ठाकरेंनी विधान परिषदेचे दोन आमदार दिले, तुला निवडून आणण्यासाठी. माझीही विधान परिषद तुझ्या मतदार संघात दिली. तेव्हा तू निवडून आलायस. तू काय मुख्यमंत्र्यांना चॅलेंज देतो? प्रसिद्धी मिळवण्यासाठी पोपटपंची आहे..’ असं म्हणत रामदास कदम यांनी ठाकरेला सुनावले आहे.