मुंबई – वरळी येथील पोद्दार रुग्णालयातील अस्वच्छतेचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांनी याबाबत कारवाईचा बडगा उचलला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, वरळी येथील काही कोरोना संशयितांना पोद्दार रुग्णालयातील विलगता गृहामध्ये ठेवण्यात आले होते. मात्र रुग्णालयामध्ये कचऱ्याचे साम्राज्य पसरले असल्याने रुग्णांनी येथील गलिच्छ परिस्थितीचे चित्रण करून ते सोशल मीडियावर टाकले.
याची माहिती वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांना समजताच त्यांनी पोद्दार रुग्णालयातील कोरोना संशयितांची सोय इतर ठिकाणी केली. तसेच संबंधितांवर कारवाईचा बडगा देखील उगारला. याबाबतची माहिती आदित्य ठाकरे यांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून दिली असून त्यांनी गैरसोय झालेल्या रुग्णांची विचारपूर करून माफी मागितल्याचे देखील सांगितले.
वरळी पोद्दार हॉस्पिटल मधून एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. काल जी गैरसोय झाली होती आणि त्यासाठी जी व्यक्ती जबाबदार होती, त्यांच्यावर कारवाई झाली आहे.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) April 6, 2020