दिल बेचारा या चित्रपटात दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतची नायिका असलेली अभिनेत्री संजना संघी लवकरच चाहत्यांच्या भेटीला येत आहे. ती अभिनेता आदित्य रॉय-कपूरसोबत आगामी “ओम : द बॅटल विदीन’ चित्रपटात पडद्यावर दिसणार आहे. या चित्रपटाकडून संजनाला खूपच अपेक्षा आहेत.
संजना म्हणाली, “एवढ्या लवकर ऍक्शन प्रकारात काम करणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. मी निर्माता आणि दिग्दर्शक कपिल (वर्मा) यांचे आभार मानते. ज्यांनी मला चित्रपटात काम करण्याची संधी दिली.
संजना आपल्या भूमिकेविषयी म्हणाली की, या चित्रपटात मी काव्याची भूमिका साकारत आहे. ती एक अशी मुलगी आहे, जिच्याप्रमाणे आपल्या देशातील प्रत्येक मुली बनू इच्छित आहे. जिच्यात खूपच आत्मविश्वास असून ती कठोर मेहनती आणि शूर आहे.
या चित्रपटात संजनाला अनेक ऍक्शन सीन्स करण्याची संधी मिळणार असल्याने ती खूपच उत्साहित आहे. यासाठी संजनाने खास ट्रेनिंग आणि तयारीदेखील सुरू केली आहे. या चित्रपटाचे शूटिंग पुढील वर्षी मार्चपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता असून तो वर्षाअखेरीस प्रदर्शित करण्यात येणार आहे.