आदित्य पंचोली आणि त्याचे कुटुंबीय गेल्या काही काळापासून सतत वादात आहेत आदित्यचा मुलगा सुरज पांचोली जिया खान आत्महत्या प्रकरणी चर्चेत होताच. तर आदित्यची मुलगी सना पांचोली हीदेखील चर्चेत आली आहे. सना पंचोली “शाकालाका बूम बूम’ मधून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार होती. मात्र काही काळामुळे तिला हा सिनेमा सोडायला लागला. तिच्या जागेवर कंगना राणावतची निवड झाली.
हा सिनेमा 2007 मध्ये रिलीज झाला आणि त्यानंतर आदित्य आणि कंगनामधील वैयक्तिक वादही चव्हाट्यावर आले. यानंतर सनाने आपले करिअर एक ऍक्टिंगमध्ये करण्याचे सोडून हॉटेल इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला. आपल्या पदार्पणातच बसलेला हा धक्का ती अखेरपर्यंत पचवू शकली नाही.
आता तिने गोव्यामध्ये हॉटेल आणि बारची श्रृंखला सुरू केली आहे आणि ती या करिअरमध्ये प्रस्थापित झाली आहे. पण तिने अभिनय न करण्यामागील नेमके कारण जगासमोर आले नव्हते.