आदित्य, नील यांचा मानांकित खेळाडूंना धक्का

पुणे: सोलारीस क्‍लब तर्फे पाचव्या फाईव्ह स्टार जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत आदित्य जोरी आणि नील मुळे यांनी अनपेक्षित निकाल नोंदविला. ज्युनिअर मुलांच्या उपांत्यपूर्व फेरीत आदित्य जोरी याने तिसऱ्या मानांकित साई बगाटे याचा 9-11, 11-8, 9-11, 11-6, 11-9, 11-6 असा सनसनाटी पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.

पाचव्या मानांकित नील मुळे याने चौथ्या मानांकित प्रणव अबदालवर याचा 11-9, 11-6, 4-11, 11-2, 8-11, 11-9 असा अनपेक्षित निकाल नोंदविला.

याच गटात सनत जैन याने जय पेंडसे याचा 11-9, 10-12, 11-9, 13-11, 6-11, 11-8 असा परभव करून उपांत्य फेरी गाठली. दुसऱ्या मानांकित श्रेयांश भोसले याने सातव्या मानांकित वेदांग जोशी याचा 11-6, 11-7, 11-6, 11-5 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली.

मुलींच्या गटात पृथा वर्टीकर, स्वप्नाली नरले, सिध्दी अचरेकर आणि धनश्री पवार यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. स्पर्धेचे उद्घाटन सोलारीसचे संचालक जयंत पवार आणि सोलारीस क्‍लबचे सीईओ हृषिकेश भानुशाली यांच्या हस्ते करण्यात आले

Leave A Reply

Your email address will not be published.