“प्रियंका गांधींनी नेहमीच यावरून राजकारण केलं” – लखीमपूर प्रकरणावरून काँग्रेस आमदाराचा घरचा आहेर

लखनौ – उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेसतर्फे प्रियंका गांधी मैदानात उतरल्या असून त्यांनी पक्षाच्या निवडणूक प्रभारी म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे. पुढील वर्षीच्या सुरुवातीला निवडणुका होणार असल्याची चिन्ह असलेल्या उत्तर प्रदेशात प्रियंका गांधी योगी सरकारला विविध मुद्द्यांवरून धारेवर धरताना दिसतायेत. अशातच काँग्रेस पक्षाच्या आमदार अदिती सिंग यांनी, ‘प्रियंका गांधींना सर्वच मुद्द्यांचे राजकारण करायचे आहे’ असं म्हणत घरचा आहेर दिला आहे.

अदिती सिंग या काँग्रेसच्या रायबरेली येथील बंडखोर आमदार आहेत. एका वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी, “लखीमपूर व अन्य प्रकरणे पाहिल्यास प्रियंका गांधी यांनी नेहमीच यावरून राजकारण केले. लखीमपूर प्रकरणाची सीबीआय चौकशी सुरु आहे, खुद्द सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेतली आहे. जर या संस्थांवरच त्यांना विश्वास नसेल  समजत नाही की त्यांचा कशावर विश्वास आहे?” असा प्रश्न उपस्थित केला.

तत्पूर्वी, लखीमपूर खेरी प्रकरणावरून प्रियंका गांधी यांनी आज सकाळीच पत्रकार परिषद घेत लखीमपुर खेरीला ज्यांच्या मुलाने शेतकऱ्यांना चिरडून ठार मारले त्या केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोलिस महासंचालकांच्या बैठकीला उपस्थित राहणे यथोचित दिसणार नाही.त्यामुळे पंतप्रधानांनी अजय मिश्रांबरोबर त्या कार्यक्रमाला उपस्थित राहु नये आणि त्यांच्या बरोबर कधीच एकत्रित व्यासपीठावर उपस्थित राहु नये अशी सुचना कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी त्यांना केली.

भाजपचे खासदार वरून गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहीत कायदे मागे घेण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. सोबतच त्यांनी पंतप्रधानांकडे काही मागण्या देखील केल्या आहेत.

वरून गांधींच्या पत्रातील महत्वाचे मुद्दे

– कृषी कायदे मागे घेण्याच्या निर्णयाचे स्वागत.

– जर हा निर्णय या पूर्वीच घेण्यात आला असता तर हून अधिक निरपराध शेतकऱ्यांचे जीव वाचवता आले असते.

– कृषी कायद्याविरोधात लढा देत असताना शहीद झालेल्या शेतकरी बांधवांच्या कुटुंबियांना प्रत्येकी कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्यात यावी. पंतप्रधानांनी स्वतः या मृत्यूंबाबत शोक व्यक्त करावा.

– आंदोलनातील शेतकऱ्यांवर राजकीय सूडबुद्धीपोटी दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावेत.

– लखीमपूर खेर येथे घडलेली घटना आपल्या लोकशाही व्यवस्थेवरील काळ डाग असून याप्रकरणाशी संबंधित असलेल्या केंद्रीय गृह राज्य मंत्र्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी. यामुळे तपास प्रक्रिया निष्पक्ष होईल.

– पक्षातील अनेक वरिष्ठ नेत्यांनी शेतकरी आंदोलनाबाबत प्रक्षोभक वक्तव्य करून तणाव निर्माण केला. ऑक्‍टोबरला लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांच्या अंगावर गाड्या चढवून शेतकऱ्यांचा खून ही याचीच परिणीती आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.