बॉलिवूड सेलिब्रिटीजना सोशल मिडीयावर नेहमीच काही ना काही कारणाने ट्रोल केले जात असते. या ट्रोलिंगला कंटाळून काही स्टारनी सोशल मिडीयावर ऍक्टीव्ह राहणेच बंद केले आहे. पण हे ट्रोलिंग बॉलिवूडचे कलाकार टाळू शकत नाहीत. या ट्रोलिंगपासून दूर जाण्याचा प्रयत्न करणेही अवघड आहे, असे आदिती राव हैदरीने म्हटले आहे.
ट्रोल करणारी मंडळी खरे तर आपल्या स्वतःच्या आयुष्यात काही ना काही अडचणींचा सामना करत असतात. त्यांच्या अडचणींवर आलेला राग ते या ट्रोलिंगच्या माध्यमातून व्यक्त करत असतात, असे तिचे मत आहे. “द एक्झिबिट टेक ऍवॉर्ड’च्या निमित्ताने ती प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधत होती.
ट्रोलिंग ही एक वास्तविकता आहे. ट्रोलिंग हा एक संवाद आहे. तो विसंवाद नाही. ट्रोल करणाऱ्यांची मानसिकता ठिक नाही, असे समजून त्याकडे दुर्लक्ष करायला पाहिजे, असे धाडसी मत तिने व्यक्त केले.
आदितीचा पुढचा सिनेमा “द गर्ल ऑन ट्रेन’ पुढच्या वर्षी रिलीज होणार आहे. हा सिनेमा 2016 साली आलेल्या हॉलिवूडच्या सिनेमाचा रिमेक आहे. ब्रिटीश लेखिका पाऊला हॉकिन्सनी लिहीलेल्या एका कादंबरीवर आधारित आहे.