मुंबई – क्रिती सेनॉन, सैफ अली खान आणि सनी सिंग स्टारर ‘आदिपुरुष’ या चित्रपटाचा टीझर गांधी जयंतीच्या मुहूर्तावर रिलीज करण्यात आला. या चित्रपटात प्रभास श्रीरामाच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच यात सैफ अली खानने रावणाची भूमिका साकारली आहे. तर सीतेच्या भूमिकेत क्रिती सेनन दिसत होती. या चित्रपटात सनी सिंग लक्ष्मणची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात मोठी आणि चांगली स्टारकास्ट आहे, जी प्रेक्षकांना खूप आवडते. पण टीझरच्या व्हीएफएक्सने प्रेक्षकांची निराशा केली. नेटिझन्स त्यावर टीका करत मीम्स शेअर करत आहेत.
चित्रपटातील व्हीएफएक्समुळे अनेकांनी आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर तर मिम्सचा पाऊस पाडला आहे. रावण रूपातील सैफ अली खानसह इतर कलाकारांवर देखील नेटकऱ्यांनी तुफान मिम्स बनवले आहेत जे मोठ्या प्रमाणात व्हायरल होताहेत. मोठ्या दिमाखात आदिपुरुषचे टीजर लॉंच करण्यात आले. २०२३ च्या पहिल्याच महिन्यात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
तर एकाने लिहिले की, “टेम्पल रन 700 कोटी रुपये आहे.”
ट्विटरवर एका युजरने सैफ अली खानच्या लूकवर कमेंट केली, “मिलिटरी कटमध्ये रावण, स्पाइक आणि बेअर्ड”
दुसर्या यूजरने लिहिले, ते ५०० कोटींची ऍनिमेटेड मुव्ही बनवत आहेत.
एका युजरने लिहिले, “गेम ऑफ थ्रोन्सची कॉपी केली” गेम ऑफ थ्रोन्समधील अनेक छायाचित्रे शेअर करत ती आदिपुरुष’च्या दृश्यांसारखी असल्याचे युजरने म्हंटले आहे.