आढळराव पाटील यांची शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्‍ती

पुणे: सलग तीन वेळा खासदार राहिलेले शिवाजीराव आढळराव पाटील यांची शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्‍ती करण्यात आली. प्रचंड जनसंपर्क आणि जनतेत मिसळून काम करण्याची हातोटी या कारणांनी त्यांची नियुक्‍ती पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या वर्धापनदिन मेळाव्यात जाहिर केली.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आढळराव पाटील यांचा निसटत्या मतांनी पराभव झाला होता; मात्र कोणतेही भ्रष्टाचाराचे आरोप नसलेला व पक्षासाठी सतस काम करणारा नेता असल्याने त्यांचा शिवसेनेत तेवढाच मान असल्याचे या नियुक्‍तीनंतर स्पष्ट झाले. वर्धापन दिनीच्या याच कार्यक्रमात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आढळराव पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते व्यासपिठावर उपस्थित होते.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

लोकांसाठी सतत काम करत होतोच; मात्र पक्षनेतृत्त्वाने दाखवलेल्या विश्‍वासाला उतरून आता माझ्यावरील जबाबदारी आणखी वाढली आहे. पक्षाचे संघटन वाढविण्याबरोबरच आगामी विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त आमदार निवडून आणून विधानसभेवर पुन्हा भगवा फडकवण्याचे स्व. बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करीन.
-शिवाजीराव आढळराव पाटील, शिवसेना उपनेते 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)