शेतमजूर महिला हल्ला प्रकरणाचा तपास पोलिस यंत्रणेने गांभीर्याने करावा, आढळराव पाटील यांची मागणी

न्हावरे- येथील शेतमजूर महिलेवर अज्ञात गुन्हेगाराकडून झालेल्या हल्ल्यात त्या महिलेचा एक डोळा काढण्याची व दुसरा डोळा निकामी झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी असून,या घटनेचा तपास पोलिस यंत्रणेने गांभीर्याने करावा.अशी मागणी शिरूरचे माजी खासदार व शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केली आहे. याकामी तापासकामी ग्रामस्थांनी देखील पोलिसांना सहकार्य करावे.असे अवाहन माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले.

न्हावरे (ता.शिरुर )येथे मंगळवारी रात्री (दि.३ ) मुक्ता राजू शिंत्रे या महिलेवर अज्ञात हल्लेखोराने हल्ला करून तिचा एक डोळा काढला तर दुसरा डोळ्याला जबर दुखापत केली.त्यात तो डोळाही पुर्ण निकामी झाल्याची घटना घडली.या घटनेच्या पाश्र्वभूमीवर आज (दि.७)न्हावरे येथे माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी मुक्ता चित्रे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना आधार दिला.यावेळी आढळराव यांनी मुक्ता चित्रे यांना उपचारासाठी दहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली.

याप्रसंगी बोलताना माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले की , या घटनेच्या संदर्भात मी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी बोललो असून,घडलेली सर्व घटना त्यांच्या कानावर घातली आहे.त्यांंनी या घटनेचा तपास लवकर पूर्ण करून गुन्हेगारास लवकरात लवकर पकडण्याच्या सूचना पोलिस यंत्रणेला दिल्या आहेत.तसेच चित्रे कुटुंबाला शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे आहोत असे आढळराव पाटील यांनी सांगितले.दरम्यान मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या सांगण्यानूसार आपण चित्रे कुटुंबियांची भेट घेण्यास आलो आहोत.

या घटनेसंदर्भातील सर्व वस्तुस्थिती आपण मुख्यमंत्र्यांना कळविणार आहोत.तसेच पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख व ससून रुग्णालयाच्या वरिष्ठांशी आपले फोनवरुन बोलणे झाले आहे. त्यांच्या सांगण्यानूसार या घटनेतील नराधम गुन्हेगाराच्या पाशवी कृत्यामुळे एक गरीब शेतमजूर महिलेला कायमचे अंधत्व आले आहे. दरम्यान नराधम गुन्हेगाराला पोलीस लवकरच पकडतील असे यावेळी आढळराव पाटील यांनी सांगितले. तसेच न्हावरे ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्ण वाहिकेचा व रुग्णालयातील रिक्त पदांचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्यात येईल असेही आढळराव पाटील यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर कटके,जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे,जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष राजेंद्र कोरेकर,शिवसेनेचे तालुका प्रमुख सुधीर फराटे,उपजिल्हाप्रमुख अनिल काशिद,पोपटराव शेलार,दत्ता गिलबिले,आनंदराव हजारे,माजी सरपंच अनिल पवार,शिवसेनेच्या अल्पसंख्याक महिला आघाडीच्या रेश्मा पठाण,उपाध्यक्षा अंजना राऊत,भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस दीपक कोकडे,शहाजी जाधव , नगरसेवक संजय देशमुख,किरण नवले,नाना सुर्यवंशी,राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षा मिनाक्षी कोरेकर,सुमन वाळुंज , मंगल पवार,जनाबाई ठोंबरे,वैशाली चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.