#AdelaideTennis : अँजेलिक कर्बरची स्पर्धेतून माघार

अॅडलेड  : जर्मनीची टेनिसपटू अँजलेक कर्बरने पाठदुखीच्या त्रासामुळे अॅडलेड इंटरनॅशनल स्पर्धेतून माघार घेतली आहे. दुस-या फेरीतील सामन्यादरम्यान पाठदुखीने डोके वर काढल्याने तिला सामना अर्धवट सोडावा लागला.

अॅडलेड स्पर्धेतील दुस-या फेरीतील सामन्यात ती युक्रेनच्या डायना यास्त्रेमस्काविरूध्द ६-३, २-० अशी आघाडीवर होती. मात्र अचानक पाठदुखीची समस्या सुरू झाली, त्यानंतर वैद्यकीय तपासणीनंतर तिला सामन्यातून माघार घ्यावी लागली.

या दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या तिच्या तयारीला मोठा झटका लागला आहे. जागतिक क्रमवारीत एकेकाळी अव्वल असलेल्या अँजेलिक कर्बरने २०१६ साली ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.