निवडणुकीसाठी मिळणार अतिरिक्‍त मनुष्यबळ

तीन दिवसांत होणार दमछाक

मावळ व शिरूर मतदारसंघासाठी केवळ तीन दिवस प्रचारासाठी उरले असून गुरुवार ते शनिवार अशा तीन दिवसांत सर्वच पक्षांच्या दिग्गजांच्या सभाचा धडाका असणार असून यामध्ये शहरात एकाच दिवशी दोन-दोन सभा पार पडणार आहेत. त्यामुळे पोलिसांचीही चांगलीच दमछाक होणार आहे. यामध्ये शरद पवार, उद्धव ठाकरे, अजित पवार, धनंजय मुंडे, आदित्य ठाकरे यांचा समावेश आहे. त्यातील शरद पवार यांची तळेगाव दाभाडे येथे गुरुवारी (दि.25) होणार आहे. प्रचार शनिवारी (दि.27) सायंकाळी थंडावणार आहे. त्यामुळे गर्दी, प्रचारसभा, रॅली यासाठी बंदोबस्त ठेवण्यात नियोजन पोलिसांना करावे लागणार आहे.

पिंपरी – तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकानंतर आता चौथ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुका 29 एप्रिल रोजी पार पडणार आहेत. पिंपरी-चिंचवड आयुक्‍तालयाच्या हद्दीत शिरूर व मावळ मतदारसंघ येतात. यासाठी आयुक्‍तालयाने पोलीस महासंचालकांकडे तीन हजार अतिरिक्‍तमनुष्यबळाची मागणी केली होती, यामध्ये 1 हजार 400 होमगार्डची मागणी करण्यात आली होती. मात्र त्यात 300 होमगार्डसची कपात करत 1 हजार 100 होमगार्ड देण्यात येणार आहेत.

पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर पुणे व पिंपरी पोलीस आयुक्‍तालयांना भेट देत तेथील आढावा घेतला होता. यावेळी पिंपरी-चिंचवड आयुक्‍तालयाने महासंचालकाकडे 3 हजार 127 मनुष्यबळाची मागणी केली होती. त्यानुसार पोलीस महासंचालकांनी 2 पोलीस उपायुक्‍त, 6 सहायक पोलीस आयुक्‍त, 20 पोलीस निरीक्षक, 50 पोलीस उपनिरीक्षक, 1 हजार 575 पोलीस कर्मचारी तसेच 1 हजार 100 होमगार्ड पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्‍तालयाला निवडणूक बंदोबस्तासाठी देण्यात आले आहेत. त्यातील पुणे व सातारा येथील पोलीसदल हे बुधवारी (दि.24) आयुक्‍तालयात दाखल झाले आहे. तसेच केंद्रीय राखीव दलाची 3 पथके ज्यामध्ये 300 जवानांचा समावेश असणार आहे.

राज्य राखीव दलाच्या तीन टीम ही मागवण्यात आल्या आहेत. बालेवाडी येथे तयार करण्यात आलेल्या स्ट्रॉंग रुमसाठीही अतिरिक्‍त केंद्रीय राखीव दलाच्या दोन व राज्य राखीव दलाच्या दोन अशा टीम मागवण्यात आल्या आहेत. आयुक्‍तालयाच्या सर्वेक्षणानुसार सुरुवातीला 35 क्रिटीकल मतदान केंद्रे सांगण्यात आली होती. त्यांची संख्याही 31 वर आली असून त्यामध्ये 38 बूथचा समावेश असणार आहे. 29 एप्रिल रोजी शिरूर व मावळ मिळून 356 केंद्रावरील 1 हजार 616 बूथवर मतदान होणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.