पुणे – महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ अर्थात “बालभारती’चे दिनकर पाटील यांच्याकडे राज्य शिक्षण मंडळाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. त्यानुसार पाटील यांनी राज्य शिक्षण मंडळाची सूत्री स्वीकारली आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. शकुंतला काळे या गेल्याच आठवड्यात सेवानिवृत्त झाल्या आहेत. त्यामुळे हे पद रिक्त होते. या पदाचा अतिरिक्त कार्यभार पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे. तसा आदेश शिक्षण आयुक्त विभागाने काढला आहे, अशी माहिती शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.