शिरूर : शिरूर शहरात आज ४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असून सुभाष चौक, डंबेनाला व लाटेआळी येथील रुग्णांचा यामध्ये समावेश असल्याचे शिरूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक तुषार पाटील यांनी सांगितले.
शिरूर शहर पुन्हा एकदा हादरले आहे. शिरूर शहराची कोरोना बाधितांची संख्या आता 37 एवढी झाली आहे. तर आज 22 जणांचे कोरोना तपासणीकरिता नमुने पाठवण्यात आले असून त्यांचा अहवाल 22 जुलै रोजी येणार असल्याचे वैद्यकीय अधीक्षक पाटील यांनी सांगितले.
शिरूर शहरातील सुभाष चौकात पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यापाऱ्याची २८ वर्षीय सून, तर त्यांच्या शेजारी राहणाऱ्या एका ८० वर्षीय माजी शिक्षक, डंबेनाला येथील 63 वर्ष वृद्ध यांचा यामध्ये समावेश असून. यामुळे शिरूर शहरात खळबळ उडाली असून शिरूर शहरातील कोरोना ची साखळी आता रोजच वाढत चालली आहे.
तरी गेल्या दोन दिवसांपासून शिरुर शहरात कडकडीत लॉक डाऊन सुरू आहे. तर शिरूर शहरात सापडलेला 80 वर्षीय माजी शिक्षक, डंबे नाला येथील 63 वर्षीय यपुरुष, व लाटे आळी येथील 37 वर्षीय तरुण यांना कोरोनाची लागण कशी झाली याबाबत माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचेही पाटील यांनी सांगितले.
शिरूर शहरातील नागरिकांनी वाढती कोरोना रुग्णांची संख्या पाहता विनाकारण घराच्या बाहेर पडू नये, मास्क वापरावे,सॅनिटायझर वापरावे, सोशल डिस्टन्स पाळावे, गर्दी करू नये, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. व शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे असे आवाहन शिरुर नगर परिषद सभागृहनेते प्रकाशभाऊ धारिवाल, नगराध्यक्ष वैशाली वाखारे, मुख्याधिकारी महेश रोकडे व स्वच्छता आरोग्य समिती सभापती विठ्ठल पवार, पाणीपुरवठा सभापती मुजफ्फर कुरेशी, नगरसेवक सचिन धाडीवाल यांनी केले,असून नागरिकांनी सुरू असलेल्या लोकांचे तंतोतंत पालन करावे असेही यावेळी सांगण्यात आले.