‘जम्बो’मध्ये आणखी 100 बेड वाढविले

10 व्हेंटिलेटरही उपलब्ध

पुणे – जम्बो कोविड केअर सेंटरमध्ये आणखी 100 ऑक्‍सिजन बेड तसेच 10 व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्यात आले असल्याची माहिती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्‍त रूबल अग्रवाल यांनी दिली. या ठिकाणी सध्या 600 रुग्ण उपचार घेत आहेत. तर गेल्या काही दिवसात प्रशासनाकडून या ठिकाणी 20 पेक्षा अधिक व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

शहरात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात करोनाचे नवीन बाधित रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे दररोज बेडची मागणी वाढत असून ऑक्‍सिजनची गरज भासणाऱ्या रुग्णांची सर्वाधिक आहे.

त्यामुळे शहरातील खासगी रुग्णालयांच्या खाटांसह महापालिकेच्या माध्यमातूनही जास्तीत जास्त बेड उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

त्यानुसार, आता जम्बो मध्ये 520 ऑक्‍सिजन बेड, 120 एचडीयू- आयसीयू बेड तसेच 40 व्हेंटिलेटर्स उपलब्ध झाले आहेत. तर, 20 साधे बेड आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.