जगातील अव्वल मार्शल आर्टिस्ट्स’ च्या यादीमध्ये बॉलीवूड अभिनेता विद्युत जमवालचे नाव समाविष्ट झाले आहे. “जगातील अव्वल मार्शल कलाकार’ शोधण्यासाठी गुगलवर सर्च केल्यावर ब्रूस ली आणि जॅकी चॅनसमवेत विद्युत जमवालचे नाव दिसते.
View this post on Instagram
विद्युतने याचा स्क्रीनशॉट त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. स्क्रीनशॉट शेअर करताना कॅप्शनमध्ये त्याने ‘जय हिंद, कलारिपयट्टू.’ असे लिहिले आहे.
View this post on Instagram
जगभरातील अव्वल मार्शल आर्टिस्टच्या यादीमध्ये नाव समाविष्ट झाल्यामुळे त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव व्हायला लागला आहे. आम्हाला तुझा अभिमान वाटतो आहे, असे एका युजरने म्हटले आहे. त्याचवेळी ‘तुला कोणीही हरवू शकत नाही.’ असे दुसऱ्या फॅनने लिहिले आहे.
View this post on Instagram
जेट ली, जॅकी चॅन, ब्रूस ली, जॉनी ट्राय न्युगेन, स्टीव्हन सीगल, डोनी येन, टोनी जा यासारख्या जगातील अव्वल मार्शल कलाकारांच्या यादीत विद्युतचा समावेश झाला आहे. विद्युत हा एक प्रशिक्षित मार्शल आर्टिस्ट आहे आणि त्याने वयाच्या तिसऱ्या वर्षापासूनच कलारिपयट्टूचे शिक्षण घेतले आहे.
View this post on Instagram
कलारिपयट्टूले जागतिक पातळीवर नेण्याची त्याची इच्छा आहे. बऱ्याचदा तो त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून धोकादायक स्टंट करणारे व्हिडिओदेखील शेअर करत असतो.