पुणेः पुणे-नाशिक महामार्गावरील नारायणगाव परिसरात शुक्रवारी सकाळी भरधाव टेम्पाेने प्रवासी वाहतूक करणाऱ्या व्हॅनला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला असून आठ जण गंभीर जखमी आहेत. नऊ पैकी सहा जण हे कांदळी गावातील रहिवाशी होते. त्यांच्या अपघाती निधनाने गावावर शोककळा पसरली आहे. या अपघातात स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा महाविद्यालयीन तरुण युवराज महादेव वाव्हाळ (वय २३) याचा मृत्यू झाला आहे. यामुळे त्याचे अधिकारी होण्याचे स्वप्न भंगले आहे.
त्याच्या निधनाची वार्ता कुटुंबीयांना समताच त्यांच्यावर दुःखाच डोंगर कोसळला आहे. अवघ्या २३ व्या वर्षी आपल्या मुलाचा अपघातामध्ये मृत्यू होणे ही गोष्टच त्याच्या घरांच्याच पचनी पडत नाहीये. तसेच युवराजचे अपघाती निधनामुळे कांदळी गावातील ग्रामस्थ देखील हळहळ व्यक्त करत आहेत. या अपघातामध्ये कांदळी गावातील निवृत्तीच्या उंबरठावर आलेल्या शिक्षिका मनीषा नानासाहेब पाचारणे (वय ५६) यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या अपघाती निधनाची बातमी त्यांच्या घरच्यांना आणि शाळेत मिळाल्यानंतर शिक्षिक, विद्यार्थ्यांना मोठा धक्काच बसला आहे.
नेहमीप्रमाणे घराबाहेर पडला अन्
युवराजला वाव्हळ याला अधिकारी व्हायचे होते. त्यामुळे त्याने स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाला सुरुवात केली होती. नेहमीप्रमाणे तो सकाळी घरातून व्हनमधून नारायण गाव येथील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या संस्थेतकडे निघाला होता. पण पुढे जाऊन आपण ज्या व्हनमध्ये बसलो आहोत, त्या व्हनचा अपघात होणार असल्याची पुसटशी कल्पनाही त्याला नव्हती. टेम्पो आणि व्हनच्या झालेल्या भीषण अपघातामध्ये त्याचा मृत्यू झाला आणि यातच त्याचे अधिकारी व्हायच स्वप्न भंगलं.
या अपघातामध्ये मनीषा पाचारणे यांचा देखील मृत्यू झाला आहे. त्या नारायणगाव परिसरात असलेल्या आनंदवाडीतील भागात एका शाळेत शिक्षिका होत्या. निवृत्तीला अवघे काही वर्ष बाकी असतानाच त्यांचा काळाने घाला आणि अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यामागे पती, दोन मुले असा परिवार आहे. अपघातात विनोद केरभाऊ रोकडे (वय ५०), चंद्रकांत कारभारी गुंजाळ (वय ५७), गीता बाबूराव गवारे (वय ४५), भाऊ रभाजी बढे (वय ६५) यांच्यासह नऊ जणंचा मृत्यू झाला.