पुणे: संस्कृती प्रकाशन आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पूणे यांच्या तर्फे आयोजित कार्यक्रमात रेरा प्रॅक्टीशनर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष अॅड. सुदीप महेश केंजळकर यांचा विशेष सन्मान आणि गौरव करण्यात आला . यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष बडोदा येथील 91 व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, सुनिताराजे पवार यांच्या उपस्थितीत श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि शाल देऊन गौरव करण्यात आला.
कायदा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल हा सत्कार करण्यात आला. त्यावेळी कवी उद्धव कानडे , जेष्ठ साहित्यिक विश्वास वसेकर आणि जेष्ठ चित्रकार श्रीधर अंभोरे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.