ऍड. आंबेडकर, ओवेसी यांची नगरमध्ये 1 मार्चला सभा

क्‍लेरा ब्रूस हायस्कूलचे मैदान निश्‍चित

नगर – वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक माजी खा. ऍड. प्रकाश आंबेडकर व एम. आय. एम. चे राष्ट्रीय अध्यक्ष बॅरिस्टर असुदुद्दीन ओवेसी यांची दि. 1 मार्च रोजी स्टेशन रस्त्यावरील क्‍लेरा ब्रूस हायस्कूलच्या मैदानावर जाहिर सभा होणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे निरीक्षक प्रा. किसन चव्हाण यांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित नियोजन बैठकीत ते बोलत होते. आघाडीचे जिल्हा निमंत्रक ऍड. अरुण जाधव, डॉ.जालिंदर घिगे, भारिपचे दक्षिण जिल्हाध्यक्ष अशोकराव सोनवणे, भारिपचे उत्तर जिल्हाध्यक्ष किरण साळवे, एम.आय.एम. चे नेते डॉ. परवेज आशरफी, सरफरोज जहागीरदार उपस्थित होते. या सभेत ऍड. आंबेडकर बहुजन आघाडीचे उत्तर व दक्षिण लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा करण्याची शक्‍यता आहे, असे अशोक सोनवणे म्हणाले.

लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी अहमदनगरमध्ये होणारी ऍड. आंबेडकर व ओवेसी यांची संयुक्त सभा जिल्ह्याच्या व राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी ठरणार आहे. कारण सध्या तरी राज्यात शिवसेना, भाजप विरुद्ध लढणारा एकमेव विरोधक म्हणून वंचित बहुजन आघाडीकडे पाहिले जाते. असा दावा यावेळी करण्यात आला. यावेळी डॉ. जालिंदर घिगे, प्यारेलाल शेख, प्रकाश वाघमारे, दिलीप साळवे, किरण साळवे, कॉ. अनंत लोखंडे, सरस्वती घोडके, अशोक आल्हाट व सुनिल शिंदे यांची भाषणे झाली. बैठकीनंतर प्रमुख कार्यकर्त्यांनी क्‍लेरा ब्रुस हायस्कुलच्या मैदानाची पाहणी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)