नवी दिल्ली – लॉक डाऊनच्या काळामध्ये जगातील अनेक लोकांची संपत्ती वेगाने वाढली आहे. त्यामध्ये टेस्लाचे ऍलन मस्क, रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुकेश अंबानी व ऍमेझॉनचे जेफ बेझॉस यांच्या नावाचा उल्लेख केला जातो. मात्र भारतातील गौतम अंबानी यांच्या संपत्तीत या सर्वापेक्षा वेगाने वाढ झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. यावरून काँग्रेसनेते राहुल गांधी यांनी टीका केली आहे.
लॉक डाउनपूर्वी अदानी यांच्या संपत्तीचे मूल्यांकन 16.2 अब्ज डॉलर होते. ते आता 50 अब्ज डॉलरवर गेले आहे. म्हणजे एक वर्षात त्यांच्या संपत्तीत 34 अब्ज डॉलरनी वाढ झाली आहे.
“तुमची संपत्ती २०२० मध्ये किती वाढली ? शून्य. तुम्ही जण्यासाठी संघर्ष करत आहात. परंतु त्यांनी १२ लाख कोटी रूपये कमवून आपली संपत्ती ५० टक्क्यांनी वाढवली आहे. तुम्ही मला सांगू शकता असं का ?,” अशा आशयाचं ट्वीट राहुल गांधींनी केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी एका बातमीचं कात्रण जोडलं आहे.
आपकी संपत्ति 2020 में कितनी बढ़ी?
शून्य।आप जीने के लिए संघर्ष कर रहे हैं जबकि उसने ₹12 लाख करोड़ कमाकर अपनी संपत्ति 50% बढ़ा ली।
आप मुझे बता सकते हैं ऐसा क्यों? pic.twitter.com/21RSspLy15
— Rahul Gandhi (@RahulGandhi) March 13, 2021
अदानी एंटरप्राइजेस या कंपनीचे शेअर 90 टक्क्यांनी वाढले. अदानी गॅसचा शेअर 96 टक्क्यांनी, अदानी ट्रान्समिशनचा शेअर 79 टक्क्यांनी, अदानी पोर्टचा शेअर 52 टक्क्यांनी, अदानी ग्रीन एनर्जीचा शेअर 12 टक्क्यांनी वाढला आहे.