अभिनेत्री उर्मिला मातोंडकरला करोनाची लागण

मुंबई : अभिनेत्री उर्मिला मातोंडकरला करोनाची लागण झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. उर्मिलाने स्वत: एक ट्टीट करत ही माहिती दिली आहे. उर्मिलाला कोव्हिडची काही लक्षणं दिसू लागल्याने तिने करोना चाचणी केली. त्यानंतर तिची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. करोनाची लागण झाल्यानंतर उर्मिलाने स्वत:ला क्वारंटीन केले असल्याचे म्हटले जात आहे.

उर्मिलाने एक ट्वीट केले असून त्यात तिने, “मी कोव्हिडची टेस्ट केली होती जी पॉझिटिव्ह आलीय. माझी प्रकृती ठिक असून मी स्वत:ला होम क्वारंटीन केलंय. माझ्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाने त्वरित करोना चाचणी करुन घ्यावी ही विनंती.” असे तिने म्हटले आहे. तसेच  उर्मिलाने दिवाळीच्या सणामध्ये प्रत्येकाने काळजी घ्या असे आवाहन केले आहे.

उर्मिलाच्या या ट्वीटवर अनेक नेटकऱ्यांनी आणि तिच्या चाहत्यांनी तिच्या उत्तम प्रकृतीसाठी प्रार्थना केली आहे. उर्मिला मातोंडकर आधी काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री निशा रावलने तिला करोनाची लागण झाल्याची माहिती दिली होती. तसंच मनसे अध्यक्ष राज ठाकरेदेखील नुकतेच करोनामुक्त झाले आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.