कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये ऍक्‍ट्रेस बेशुद्ध

72 वा आंतरराष्ट्रीय कान फिल्म फेस्टिव्हल सध्या जोरात सुरू अहे. या ठिकाणी रेड कार्पेटवर सगळ्या ऍक्‍ट्रेस कोणत्या ड्रेसमध्ये येतात, त्यांचे फॅशन ट्रेन्ड कोणते आहेत, त्यांनी कोणती थीम अनुसरली आहे, याकडे अख्ख्या फॅशन वर्ल्डचे लक्ष लागलेले असते. प्रियांका, दीपिका, कतरिना, कंगणा आदी बॉलीवूड कन्या आपल्या फॅशनेबल डिझाईनच्या ड्रेसमध्ये या फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाल्या. आपल्याकडे लक्ष वेधून घेण्याचा खटाटोप काही वेळेस महागात पडू शकतो, याचे एक उत्तम उदाहरण यंदाच्या कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये बघायला मिळाले.

अमेरिकेतली ऍक्‍ट्रेस एली फॅनिंग कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये एका डिनर पार्टीच्यावेळी चक्‍क बेशुद्ध पडली. सगळ्यांची धावाधाव झाली आणि तिला योग्य ती वैद्यकीय मदत पुरवण्यात आली. तपासणीनंतर ती सावध झाली. ती अचानक बेशुद्ध का पडली, याची कारणे शोधली गेली. खरे कारण समजल्यावर तिथे उपस्थित असलेले पब्लिकच बेशुद्ध पडायची वेळ आली. एली बेशुद्ध पडण्यामागचे कारण होते, तिने परिधान केलेला उंची ड्रेस. डिनर पार्टीसाठी एलीने अतिशय सुंदर ड्रेस बनवून घेतला होता. 1950 सालच्या फॅशनच्या आधारे प्राडा प्रोग ड्रेसचे डिझाईन तिने मुद्दाम करवून घेतले होते. त्यात उठून दिसावे म्हणून ड्रेसचे फिटींग तिने अगदी टाईट ठेवले होते. या टाईट फिटींगमुळेच एलीला त्रास झाला आणि ती चक्‍कर येऊन खाली कोसळली. एलीने नंतर सोशल मीडियावरच्या पोस्टमध्ये आपली झालेली फजिती सविस्तर लिहिली आहे.

एली कोसळली तेंव्हा ब्रिटीश ऍक्‍ट्रेस कोलिन फर्थ सर्वात आगोदर तिच्या जवळ पोहोचली आणि मेडिकल हेल्प उपलब्ध होईपर्यंत ती तेथून हालली नाही. एली ही या फेस्टिव्हलसाठी सिनेमांची निवड करणाऱ्या 9 सेलिब्रिटी ऍक्‍टर्सपैकी एक आहे. त्यामुळे तिच्याबाबतीत घडलेल्या या किस्स्यामुळे कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये खुमासदार चर्चा रंगली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.