Pushpa 2 The Rule | दक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनचा बहुप्रतिक्षित ‘पुष्पा 2’ चित्रपट सध्या चर्चेत आहे. या सिनेमाचा पहिला भाग ब्लॉकबस्टर ठरला होता. त्यानंतर सीक्वलबाबतही चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. या चित्रपटात आता श्रीलीलाची देखील एन्ट्री झाली आहे. निर्मात्यांनी एका अप्रतिम पोस्टरद्वारे श्रीलीला एका खास गाण्याच्या माध्यमातून पुष्पा 2: द रुलचा भाग असणार असल्याचे जाहीर केले आहे.
‘पुष्पा: द राइज’ मधील ‘ऊ अंतवा ‘हे गाणे खूप गाजले. हे गाणे जगभर प्रसिद्ध झाले. आता अल्लू अर्जुन दक्षिण भारतातील डान्सिंग क्वीन श्रीलीलासोबत डान्स करण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लवकरच जाहीर होणार आहे. चित्रपटाच्या या खास डान्सचे नृत्यदिग्दर्शन गणेश आचार्य यांनी केले आहे. श्रीलीला ‘पुष्पा २: द रुल’ मधील एका धमाकेदार गाण्यात दिसणार आहे. हे गाणे चित्रपटाचे मुख्य आकर्षण ठरणार असून यात श्रीलीला ग्लॅमरस लूकमध्ये दिसणार आहे.
Team #Pushpa2TheRule welcomes The Dancing Queen @sreeleela14 on board for the #Kissik Song of the Year❤🔥
This song is going to be a dance feast and a musical delight 💥💥💥
GRAND RELEASE WORLDWIDE ON 5th DECEMBER, 2024.#Pushpa2TheRuleOnDec5th
Icon Star @alluarjun… pic.twitter.com/liaIZQCL3s
— Pushpa (@PushpaMovie) November 10, 2024
‘पुष्पा 2’ मधून रिलीज झालेल्या पोस्टरमध्ये अभिनेत्री श्रीलीला काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. यामध्ये अभिनेत्रीचा सुंदर लूक पाहायला मिळतोय, ज्याने चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. गाणे रिलीज न करताही चाहत्यांनी ते ब्लॉकबस्टर घोषित केले आहे. श्रीलीलाच्या या लूकवर चाहते खूप खूश आहेत.
दरम्यान, समंथाच्या ‘ऊ अंतवा’ गाण्याला मोठी लोकप्रियता मिळाली. अशा परिस्थितीत श्रीलीला त्यांच्याशी टक्कर देऊन चित्रपटाला पूर्वीसारखीच प्रसिद्धी देऊ शकते का, हे पाहावे लागेल. दरम्यान, श्रीलीला ही कन्नड आणि तेलगू चित्रपटांसाठी ओळखली जाते. तिने 2019 मध्ये ‘किस’ या चित्रपटातून चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. याशिवाय तिने ‘आदिकेश्व’, ‘धमाका’, ‘स्कंद’ आणि ‘भगवंत केसरी’ या चित्रपटांमध्ये काम करून प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. ती अखेरची महेश बाबूसोबत ‘गुंटूर करम’ चित्रपटात दिसली होती.
दरम्यान, पुष्पा २: द रुलमध्ये अल्लू अर्जुन, रश्मिका मंदान्ना आणि फहाद फासिल मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट ५ डिसेंबर २०२४ रोजी जगभरातील थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे.
हेही वाचा: