बॉलीवूड अभिनेत्री सुष्मिता सेनने वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी आपली मुलगी दत्तक घेऊन सर्वांना आश्चर्यचकित केले होते. आजच्या काळात प्रत्येकजण अभिनेत्रीच्या या कामाचे कौतुक करताना दिसत आहे, पण तुम्हाला माहित आहे का की सुष्मिता सेन व्यतिरिक्त अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी या पद्धतीने काम केलं आहे.
नुकताच पुष्पा 2 हा चित्रपट प्रदर्शित झाला असून या चित्रपटात आयटम सॉंग करणाऱ्या श्रीलीलाने वयाच्या 21 व्या वर्षी दोन मुले दत्तक घेऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. एक उत्कृष्ट अभिनेत्री आणि नृत्यांगना असण्यासोबतच श्रीलीला एक सुंदर व्यक्ती देखील आहे.श्रीलीलाने अद्याप लग्न केलेले नाही. अभिनेत्रीच्या अफेअरच्या बातम्या सतत येत असतात, मात्र आजपर्यंत तिचे नाव कोणाशीही पक्के झालेले नाही.
2022 मध्ये जेव्हा श्रीलीला अनाथाश्रमात गेली तेव्हा दोन अपंग मुलांना पाहून अभिनेत्री तिथे थांबली. श्रीलीलाने या अनाथाश्रमातून 10 महिन्यांचा गुरु आणि एक मुलगी शोभिता यांना दत्तक घेतले होते. ती या दोन मुलांचा सांभाळ स्वतः करत आहे. दोन मुलांच्या जबाबदाऱ्यांदरम्यान 23 वर्षांची श्रीलीलाही तिच्या करिअरकडे पूर्ण लक्ष देत आहे. आता ती साऊथची टॉप आयटम गर्ल बनली आहे.