बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा कायम सोशल मीडियावर चर्चेत असते. तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. सोनाक्षीने याच वर्षी जून महिन्यात झहीर इक्बालबरोबर लग्न केलं. त्यानंतर आता ती गरोदर असल्याच्या चर्चा होत आहेत. या सर्व चर्चांवर सोनाक्षीने प्रतिक्रिया दिली आहे.
View this post on Instagram
सोनाक्षीने एका मुलाखतीदरम्यान प्रेग्नंसीच्या चर्चांवरून मौन सोडले आहे. ती म्हणाली लग्नानंतर आम्हा दोघांना अनेक व्यक्ती, नातेवाईक आणि मित्र-मैत्रिणी घरी जेवणासाठी बोलावत आहेत. त्यामुळे मला हे स्पष्ट करायचं आहे की, मी गरोदर नाही. फक्त मी थोडी जाड झाले आहे.” लग्न झाल्यापासून ते फक्त आऊटिंग, लंच आणि डिनरच्या आमंत्रणांनाच हजेरी लावत आहेत. सध्या त्यांना इतर कोणत्याही कामासाठी वेळ मिळत नाही.
सोनाक्षी आणि झहीर एकमेकांना बरेच वर्षे डेट करीत होते. २३ जून २०२४ ला त्यांनी मुंबईत नोंदणी पद्धतीनं लग्न केलं. त्यानंतर त्यांनी सर्वांना रिसेप्शन पार्टी दिली होती. त्यांच्या या पार्टीला कुटुंबातील व्यक्तींसह बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.