मुंबई – अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणाशी संबंधित अंमली पदार्थ रॅकेटची चौकशी एनसीबी अर्थात अंमली पदार्थविरोधी पथकातर्फे सुरु आहे.
चौकशी दरम्यान एनसीबीच्या हाती ड्रग्ज रॅकेटमध्ये आणखी काही बॉलिवूडकर सामील असल्याबाबतचे पुरावे लागले आहेत. याच पुराव्यांच्या आधारे आता एनसीबीकडून अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान,आणि श्रद्धा कपूर यांना चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे.
#WATCH: Actor Shraddha Kapoor reaches Narcotics Control Bureau zonal office in Mumbai.
She has been summoned by NCB to join the investigation of a drug case, related to #SushantSinghRajput‘s death case. pic.twitter.com/RT2uGlC9DW
— ANI (@ANI) September 26, 2020
यातच मिळालेल्या माहितीनुसार, नुकतीच अभिनेत्री श्रद्धा कपूर एनसीबी कार्यालयात दाखल झाली. अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणाच्या चौकशीमध्ये बॉलिवूडमधील ड्रग्स प्रकरण समोर आलं आहे. यामध्येच अभिनेत्री दीपिकासह सारा अली खान,आणि श्रद्धा कपूर , रकूल प्रित सिंह नाव समोर आलं आहे. त्यामुळे आज अमली पदार्थ विरोधी पथक (एनसीबी) दीपिका, सारा अली खान,आणि श्रद्धा कपूर चौकशी करणार आहे.