वाहन अपघातात अभिनेत्री शबाना आझमी जखमी 

मुंबई – जेष्ठ बॉलिवूड अभिनेत्री शबाना आझमी यांच्या चारचाकी वाहनास आज मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अपघात झाला. याबाबत अधिक माहिती अशी की, अभिनेत्री शबाना आझमी यांचे चारचाकी वाहन (एमएच ०२ सीझेड ५३८५) व एका ट्र्क दरम्यान मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील खालापूर टोल नाक्याजवळ धडक झाली.

जखमी झालेल्या शबाना आझमी व वाहन चालकास तातडीने पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून यावेळी गाडीमध्ये जावेद अख्तर हे देखील होते मात्र त्यांना कोणतीही इजा झाली नाही अशी माहिती रायगड पोलिसांनी दिली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here